सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पोलिसांनी वणी शहरातील दीपक चौपाटी वर जुगार खेळणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे.तर अन्य पसार झाले.ही कारवाई 20 जुलै रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास केली.
गेल्या काहीं दिवसापासून वणी शहरातील दीपक चौपाटी, जत्रा मैदान ह्या ठिकाणी जुगार खेळण्यात येत असताना जुआरी पोलिसांच्या रडारवर होते, रविवारी या ठिकाणी छापा मारला असता गुलाब बापूराव उमरे रा. लाठी, प्रवीण सूर्यभान गेडाम रा. पुरड हे पत्ते खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून नगदी 4670 रुपयांची मुद्देमाल व पत्ते जप्त करण्यात आले.पोलीस नाईक यांच्या फिर्यादी वरून मजुका नुसार सदरचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सावसागडे करत आहे. मात्र, इतर जण पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशानुसार वणी पोलिसांनी केली आहे.