सचिनभाऊ रासेकर यांची चिटणीस पदी नियुक्ती

सचिनभाऊ रासेकर यांना नियुक्ती पत्र देताना मा. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोहदा ग्रामपंचायत चे कर्तव्यदक्ष उपसरपंच सचिनभाऊ रासेकर यांची भाजपाच्या ग्रामीण मंडळ चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

भारतीय जनता पार्टीचे मा. आमदार संजीरेड्डी बोदकूरवार (वणी विधानसभा क्षेत्र) यांनी सचिनभाऊ रासेकर यांच्या नियुक्तीचे पत्र दिले असून पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप जेजुरकार यांनी सचिनभाऊ रासेकर यांचे अभिनंदन करुन पक्षाच्या कामकाजात आघाडीवर राहुन काम करण्याचे आणि पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

सचिन ज्ञानेश्वर रासेकर हे मोहदा ग्रामपंचायतच्या उपसरपंच म्हणून कार्यरत आहे. ते उपसरपंच कार्यकाळात उत्तम काम केले आहे. याशिवाय शेतकरी, शेतमजूर, वनहक्क, दिव्यांग, निराधार, या त्यांच्या गावातील ग्रामपंचायत व विकास कामातही त्यांचे आजतागायत कार्य सुरूच आहे,हे विशेष..

भाजपात दाखल होताच उपसरपंच असलेले सचिनभाऊ रासेकर यांनी भारतीय जनता पार्टी चे काम, विशेष करून निवडणूक काळात ग्रामीण भागात अधिकाधिक प्रामाणिकपणे रात्रंदिवस एक करून काम केले आहे.

सचिनभाऊ रासेकर यांना भारतीय जनता पक्षाचे शिरपूर शिंदोला,लाठी लालगुडा वणी ग्रामीण चिटणीस पद मिळावे ही अनेकांची इच्छा होतीच,शिवाय पक्षातुन पाठपुरावा मिळाला आणि रासेकर यांना सदर पदाची जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारी वर खरे उतरून आपण आणखीन पक्ष वाढीस काम करू अशा भावना नवनिर्वाचित चिटणीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.

वणी विधानसभेचे मा. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्यासह अनेकांनी सचिनभाऊ रासेकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous Post Next Post