रेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रक पकडले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव
: येथील महसूल विभागाने रेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रक पकडले आहेत. या एकाच आठवड्यात पाठोपाठ कारवाईनी तालुक्यातील चोरटे अलर्ट झाली.

चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करीत असतांना कोसारा (ता. मारेगांव) येथील रोडवरुन जात असताना दोन ट्रक पकडून तहसील कार्यालय मारेगांव येथे लावण्यात आले आहे. मा. श्री नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, ग्राम महसूल अधिकारी प्रविण उपाध्याय, बी एन धोटे, महसूल सेवक दिलीप पचारे, अमित येवले यांनी केली असून, यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी उघडकीस आली आहे. विशेष उल्लेखनीय की, या अगोदर दिनांक 17 जुलै 2025 रोजी कोसारा शिवारात असलेल्या सोईट ते खैरी रोडवरुन अवैध रेती उत्खनन करीत असताना 13 ब्रास चा ट्रक पकडण्यात आला होता.

या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 
Previous Post Next Post