वणीत महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिनानिमीत्य "सेवा ते संघटन" अभियान राबविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, वणी शहर व तालुक्याचे वतीने दिनांक २२ जुलै रोजी मंगळवारला वसंत जिनिंग हॉल वणी येथे सकाळी ९:०० वाजता भव्य महा रक्तदान शिबीराला सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांसह नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

रक्तदान हे जीवनदान असून, अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ते आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेच्या वतिने राबवण्यात आला. या उपक्रमास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, तारेंद्र बोर्डे, दिनकरराव पावडे, सौ मंगलाताई पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रदिप जेऊरकार, शहराध्यक्ष ऍड.निलेश चौधरी, पवन एकरे, सत्यजित ठाकूरवार, सौ संध्याताई अवताडे, आरती वांढरे, प्रीती बिडकर, यांच्यासह पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. 

या शिबीराला नऊ वाजेपासून सुरूवात होऊन दुपारी तीन पर्यंत शिबीर पार पडले. या दरम्यान जवळपास 353 रक्त दात्यांनी रक्तदान केले असून वणी विधानसभा 76 पाच मंडळांपैकी तीन मंडळातील ही माहिती समोर आली. नागरिकांनी आपला वेळ देऊन या उपक्रमात सहभागी झाल्या बद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले आहे.
Previous Post Next Post