सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मागील काही दिवसापासून त्यांची तब्बेत खालावली होती, त्यांना नागपूर येथे उपचारार्थ दाखल केले होते. मात्र,उपचार निरर्थक ठरत त्यांचे दि. 24 जुलै 2025 रोजी रात्री 2 वाजता प्राणजोत मालवली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा त्यांना अनेकदा सहवास लाभला होता. त्यातूनच स्वताचे जीवन गुरूदेव सेवा मंडळाला अर्पण करून ग्रामगीतेचा प्रचार तालुकाभर ते करीत राहिले. असे जेष्ठ प्राचारक तथा मार्गदर्शक श्री तात्याची सोमलकर श्री गुरुदेव चरणी लीन झाले. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, एक मुलगी, जावई,स्नुषा व नातवंड असा परिवार आहे. त्यांचेवर आज गुरुवारला दुपारी २: ०० वा देवाळा येथील मोक्षधामात अंत्यविधी होणार आहे.
💐मारेगाव तालुका गुरूदेव सेवा मंडळ कडून भावपूर्ण श्रद्धांजली