मजरा येथे सोयाबीन पिकावरील शेतकरी प्रशिक्षण संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया - मुल्य साखळी समुह (VCC) अंतर्गत सोयाबीन पिकावरील शेतकरी प्रशिक्षण मंगळवारला तालुक्यातील मजरा येथील मातोश्री मंगल कार्यालयात पार पडले.
   
या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक वणी मंडळाचे मंडळ कृषि अधिकारी मा.दिपक वानखडे साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी बि.व्हि.वनकर ,तसेच प्रतिक लालसरे सर यांनी सोयाबीन पिकासाठी जमीन तयार करणे पासुन ते सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी घेणे,बिज प्रक्रिया करणे, पेरणी करताना पेरणीची खोली, पेरणीचे अंतर,योग्य वाणाची निवड, बियाण्याची शुद्धता तपासणी,खताचा संतुलित वापर करणे, सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडी जसे- हिरवी उंटअळी,चक्री भुंगा,खोड माशी,हुमणी किडी, इत्यादी महत्वाच्या किडींची माहिती व त्याची नुकसान पातळी व त्यावरील नियंत्रणाचे उपाय, एकात्मिक किड नियंत्रणाचे उपाय सुचवले .तसेच रोग व त्यावरील नियंत्रणाचे उपाय इत्यादी बाबिंवर सखोल मार्गदर्शन केले तसेच फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले व माहिती दिली.

तसेच विषबाधा झाल्यास त्याची लक्षणे व प्राथमिक उपचारा बाबतची माहिती दिली. तसेच सोयाबीन पिकाची शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन किडींचे निरिक्षण करुन मित्र किडी व शत्रू किडींची ओळख करुन देण्यात आली.तसेच कृषि विभागाच्या विविध योजना जसे- रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड,वृक्ष लागवड, वैयक्तिक शेततळे,PMFME योजना,PM-Kisan योजना Agristack फार्मर आय डी काढणे, इत्यादी बाबिंची सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि ताई मनिषा आत्राम, विठ्ठल आत्राम,स्वप्नील महारतळे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.
Previous Post Next Post