सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : एका फ्लॅट राजरोज सुरू असलेल्या अनाधिकृत ऑनलाईन वरली मटका अड्ड्यावर छापा टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त करून सदर इसमाविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वणी शहरात पद्मावती नगरी येथील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर छापा मारून तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक केली. वणी पोलिसांनी घटनास्थळावरून 1 लाख 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह लक्ष्मी नारायण अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटवर छापा मारला.
या कारवाईत पोलिसांनी गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (वय 60, रा. वारंगल, तेलंगणा), राजेंद्र यादगीरी येलगंटी (वय 52, रा. पेगडामपल्ली, तेलंगणा), फरदिन अतिक अहेमद (वय 24, रा. सबा कॉलनी, वणी) आणि स्वामी कोमराया बोक्का (वय 36, रा. म्युचाराला, तेलंगणा) यांना अटक केली.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अँड्रॉइड मोबाईल (अंदाजे किंमत 40 हजार रुपये), दोन जुने मोबाईल (अंदाजे किंमत 40 हजार रुपये), दोन टॅब (अंदाजे किंमत 20 हजार रुपये), एक प्रिंटर (अंदाजे किंमत 20 हजार रुपये), दोन कॅल्क्युलेटर (अंदाजे किंमत 500 रुपये), एक लॅपटॉप (अंदाजे किंमत 25 हजार रुपये), वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि 9 हजार 200 रुपये रोख असा एकूण 1 लाख 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेंच फ्लॅट मालकावर गुन्हा दाखल केला,पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धिरज गुल्हाने करत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार पी एस आय धिरज गुल्हाने, पी एस आय अंकुश वडतकर, मिथुन राऊत, मोनेश्वर खंडरे, गजानन कुडमेथे, नंदकुमार पुप्पुलवर यांनी केली.