सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : दहा ते बारा दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने वणी उपविभागीय क्षेत्रात बुधवार (ता. २३) दुपारी जोरदार हजेरी लावली. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. चिडचिड, सूर्याची उघडझाप सुरु होती. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास पावसाने जोरदार हाजरी दिली. कामावर गेलेल्या नोकरदारांना परतीची वाट धरावी लागली. गेली दहा ते बारा दिवस वरून राजाने दडी मारली होती, थंड गरम वातावरण होत होते, नागरिकांची अंगाची लाही लाही होत असे असताना शेतकऱ्यांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती,अशातच बुधवार पासून पावसाने हजेरी लावली. वणी, झरी, मारेगाव, तालुक्यात जोरदार पाऊस झाला.