सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यासाठी तालुक्यातील कोसारा येथील शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करू, अशा आशयचे निवेदन आज दि. 21 जुलै तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती कडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यानंतर सरकार सत्तेत आले, जवळपास एक वर्ष होत आहे.परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नसून सरसकट कर्जमाफीही मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यात यावा यासाठी कोसारा येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत कोसारा हद्दीतच येत्या गुरुवारी (ता. 24) ला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत चे निवेदन तालुका प्रशासनाला दिले आहे.
निवेदनावर उपसरपंच तथा शेतकरी सचिन पचारे, पांडुरंग नन्नावरे, ईश्वर झोटिंग, अंकुश खाडे,किसन लांडगे,राजू येरेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.