सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरात नेहमीच विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. वणी शहरात भक्ती गीतांवर आधारित विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अ गटातून 6 वर्षाच्या भार्गवी डडमल ने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. अ गट एकल नृत्य 5 ते 14 वयोगटा मध्ये 37 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता व ब गट समूह नृत्य 5 ते वरील मध्ये 13 समूहाने स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व जेष्ठ नाट्य कलावंत अशोक सोनटक्के, भाजपचे प्रदेश सदस्य, सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, सिमा चोरडिया, संस्कार भारती समिती वणी शाखेच्या अध्यक्षा रजनी पोयाम,निलिमा काळे, प्रा. अभिजित अणे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
अ गट प्रथम क्रमांक भार्गवी डडमल रुपये 3001, द्वितीय क्रमांक लावण्या आगलावे रुपये 2001, तृतीय क्रमांक यशस्वी घाटे रुपये 1001 तर ब गटात गुरुकुल प्रथम रुपये 5001, शिवतांडव द्वितीय रुपये 3001, नुपूर निकेतन तृतीय रुपये 2001 व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण सिमा सोनटक्के, प्रेम निगुरकर, जयंत कुचनकर यांनी केले असून तिन्ही परीक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला सुरेंद्र निब्रड, संजय पिंपळशेडे, संजय खाडे, सुधीर पांडे, अरुण पटेल, राहुल चट्टे, तुषार नगरवाला, पियुष पटेल, अॅड. निलेश चौधरी, संतोष डंभारे यांचे सहकार्य लाभले असून या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी सुरेखा वडिचार, जयश्री सोनटक्के, प्रिया कोणप्रतिवार, सुमित्रा गोडे, प्रियंका कोटनाके, निशा उपरे, संध्या अवताडे,रजनी गारघाटे, सुनंदा गुहे, पंढरीनाथ सोनटक्के, प्रविण सातपुते, सागर मुने, राजू खुसपुरे, अर्पित मोहुर्ले, आणि सागर झेप बहुद्देशीय संस्था व संस्कार भारती समिती च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.