सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वणी तालुकाध्यक्षपदी नवनिर्वाचित प्रदिप जेऊरकर यांनी पदाची जबाबदारी घेताच वणी तालुक्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीची रचना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असल्याचे म्हटलं जातं. यामध्ये 60 पदाधिकाऱ्यांचा एकूण समावेश आहेत.
या जाहिर कार्यकारिणीत 2 सरचिटणीस, 6 उपाध्यक्ष, 7 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष तर 43 कार्यकारिणी सदस्यांची मोठी नियुक्ती करण्यात आली आहे.
सरचिटणीस पदी मंजुभाऊ डंभारे, हेमंत गौरकार, सचिन खाडे, उपाध्यक्षपदी सौ. रंजना बांदुरकर, सौ. विद्या पचकटे, सचिन नावडे, जयंवत खोकले,मोरेश्वर येरगुडे, प्रकाश बोबडे, तर चिटणीस पदी धिरज पारोधी,सचिन रासेकर, अर्चना किनाके, रक्षणा गजभिये, मंगेश जेनेकार, उज्वला रविंद्र धांडे, तर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिपक मत्ते यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य:
देवेंद्र पारखी, बाळू खामणकर, संजय खाडे, संदिप धागी, तुळशिराम मोहितकार, जिवन काकडे, गिरीधर आगलावे, देवराव कोल्हे, गणेश डाहूले, श्रीराम राजुरकर, प्रमोद लोडे , भाडुराव लोडे, अमोल रेंगुलवार, विजय टोंगे ,दिवाकर झाडे, महादेव दातारकर, गणेश जेनेकार, महादेव पानघाटे, रवि भोयर, राजु कुमरे, शांताराम उपासे, सुनिल देवतळे, सोनल बोर्डे, कैलास धांडे, सौ. विजया पाटील, धनश्री पायघन, सिमा बोरकुटे, विठ्ठाबाई कोडापे, अरुणा जेनेकार, सिमा बदकी, रंजना बोबडे, वैशाली सुर, रंजना खामनकर, गिता मेश्राम, रेखा बोढाले, विद्या तंलाडे, मंगला आवारी, गिता राजगडे, अश्विनी आत्राम, वर्षा राजुरकर, देवांगणी कांबळे, कुसूम खिरटकर, सुरेखा तितरे यांची निवड करण्यात आली.