राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित 'महा रक्तदान' शिबीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जन्मदिननिमित्त भारतीय जनता पार्टी मारेगाव शाखेच्या वतीने, मा. श्री. रविंद्र चव्हाण अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या संकल्पनेतून एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

दिनांक २२ जुलै २०२५ (मंगळवार) ला सकाळी १० ते दुपारी. ३ वाजे पर्यंत स्थानिक शेतकरी सुविधा भवन मारेगाव, रोड येथे महा रक्तदान शिबीर पार पडणार आहे.

हे शिबिर सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून या महाशिबिरात तालुक्यातील असंख्य रक्तदात्यांनी स्वखुशीनं सहभाग नोंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” ही संकल्पना कृतीतून सिद्ध करावा. असं आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.
Previous Post Next Post