सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : माजी मंत्री मा. बच्चू भाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी २४ जुलै रोजी दोन तास महाराष्ट्र राज्यव्यापी 'चक्का जाम' आंदोलन करण्याचे घोषणा केली होत.
त्या समर्थनार्थ वणी उपविभागीय क्षेत्रात सरपंच संघटनेने काम बंद आंदोलनाचा पाठिंबा दिला. तसेंच प्रहार वणी च्या वतीने लालपूलिया वणी- मारेगाव या महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. हे आंदोलन शांततेत पार पडले.
कर्जमाफी साठी पाठिंबा देताना निवेदन सादर |
प्रहार चे लालपूलिया वर चक्काजाम आंदोलन |
वणी उपविभागातील या आंदोलनात सामान्य नागरीक, शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर आणि सर्व कष्टकरी वर्गाचा सहभाग दिसून आला,हे आंदोलन शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पाडले. यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याचे उपविभागातील आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आभार मानले.