Top News

नंदीग्राम एक्सप्रेस खाली येऊन तरुणाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मुंबई-बल्लारशा-नंदीग्राम एक्सप्रेस खाली येऊन एका तरुणाचा कटून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. १७ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास चिखलगाव ते नांदेपेरा रेल्वे गेट दरम्यान घडली. 

शिव बालक राजेंद्र पटेल (२९) रा.सोनवर्षा जिल्हा रिवा (मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव असून तो वणी येथील एका बियर बार मध्ये काम करत होता. नंदीग्राम एक्सप्रेस ही मुंबईवरून व्हाया वणी येत असताना ही घटना घडली. तरुण रेल्वेखाली आल्याचे लक्षात येताच रेल्वे थांबविली. या घटनेमुळे नंदीग्राम एक्सप्रेस बराच वेळ थांबवण्यात आली होती. 

स्थानिक पोलीस व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे हलविण्यात आला.
Previous Post Next Post