सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
या शेती शाळेत महिला शेतकऱ्यांना कापुस पिकांच्या पुर्व मशागती पासुन ते बिज प्रक्रिया करणे, बियाणे उगवण क्षमता चाचणी, कापुस पिकावरील विविध किडी व रोग, त्यांच्या नियंत्रणाचे उपाय, यामध्ये मशागतीय, जैविक, यांत्रिक, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, रासायनिक किड नियंत्रण तण व्यवस्थापन,खत व्यवस्थापन, तसेच फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीचे प्रात्यक्षिक, दशपर्णी अर्क कसा तयार करावा लागतो. वेगवेगळ्या वनस्पतीच्या पानाचे प्रमाण व अर्क वापरण्याची पद्धत, यांचे लाइव्ह प्रात्यक्षिक नैसर्गिक शेती अभियानाच्या कृषि सखी चेतनाताई काकडे व रत्नमालाताई सपाट यांनी करुन दाखवले, तसेच उमेदच्या आय सि आर पी (ICRP) ताई यांनी महिला बचत गटाच्या शेतकरी महिलांना उपस्थित ठेवण्यात मोलाचे सहकार्य केले. यावेळी कृषि विभागाच्या विविध योजनाची माहिती देखील देण्यात आली. यामध्ये रो.ह.यो.अंतर्गत फळबाग लागवड योजना, बांबु लागवड, तुती लागवड, पि.एम किसान, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी इत्यादी विषयांचे मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
ही शेतीशाळा घेण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या कृषि ताई खुशबु तेलतुंबडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच गावातील असंख्य महिला शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.तसेच काही पुरुष शेतकऱ्यांनी पण उपस्थिती दर्शविली. या शेती शाळेत सहाय्यक कृषी अधिकारी बि.व्हि.वनकर, व्हि.एस. फुलमाळी, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी राहुल मेश्राम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा केली आणि ही संपुर्ण शेतीशाळा FES ॲप्समध्ये घ्यावयाची असल्यामुळे व ॲप्सची हाताळणी फार किचकट व गुंतागुतीची होती, त्यामुळे उपस्थित असलेल्या तिन्ही सहाय्यक कृषी अधिकारी यांनी कसोसीने प्रयत्न करुन व शेतीशाळा यशस्वीपणे पार पाडुन शेतीशाळेची सांगता करण्यात आली.