अभिमानास्पद! चिखलगावची सुपुत्रीची गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील मंगेश येनूरकर यांची कन्या कु. देवयानी येनुरकर हिने IIT (BHU) काशी हिंदु विद्यापीठ येथे पोटॅशियम फेरीक ऑक्सलेट नॅनोकनांचे संशोधन यशस्वीपणे पूर्ण केले आहे.तिची या गुणवत्तापूर्ण उल्लेखनीय कामगिरी चे कौतुक व अभिनंदन होत आहे.

वाढत्या वय, कोलेस्टेरॉल तसेच इतर आजारांमुळे शरीरातील रक्त घट्ट होऊन रक्तवाहिन्यांमध्ये गाठी (थ्रोम्बोसिस) तयार होतात. रक्तप्रवाहात अडथळा येऊन हृदयघात, ब्रेन हेमरेज, लकवा होऊ शकतो. रक्त पातळ करण्यासाठी अनेक महागड्या औषधे बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या औषधाचे शरीरावर साइड इफेक्ट सुद्धा होण्याची शक्यात असते. मात्र,महादेव नगरितील एका प्रतिभाशाली प्रगतीशील मुलीने केलेल्या संशोधनामुळे येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता मानली जात आहे.

संशोधन पथकाचे डॉ. सुदीप मुखर्जी यांचे नेतृत्वात देवयानी हिने हा शोध लावला आहे. सध्या हे संशोधन प्राथमिक स्तरावर असून मानव प्रजातीवर परीक्षण, पेटंट, आणि उत्पादन प्रक्रियेनंतर बाजारात उपलब्ध होणार आहे. हे संशोधन थ्रोम्बोसिस म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होणाऱ्या गंभीर आजारावर उपयुक्त ठरणार आहे.

देवयानी येनुरकर हिची उल्लेखनीय कामगिरी व वणी शहराचा नाव जागतिक स्तरावर उंचावल्याबद्दल महादेव नगर, चिखलगाव येथील राहते घरी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन कु. देवयानी हिचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कु. देवयानी हिचे वडील मंगेश येनूरकर, आई गौरी येनुरकर सह धनंजय आंबटकर, तानाजी पाऊनकर, ओमप्रकाश निमकर, संजय पोटदुखे, दिलीप पडोळे, विवेक बुटले, शैलेश आडपावार व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post