आसोफो च्या वतीने सत्कार समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आदिवासी सोशल फोरम वणी यांच्या वतीने दि.13 जुलै 2025 रोज रविवार ला सकाळी 11 वा. शेतकरी मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.  

कार्यक्रमाचे उदघाटक व सत्कारमूर्ती ना. श्री. प्रा. अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री उत्तम गेडाम लेखक कवी, साहित्यिक जेष्ठ सामाजिक विचारवंत, वणी विशेष अतिथी मा श्री संजीवरेड्डी बोदकुरवार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र, तर प्रमुख पाहुणे मा श्री बाबाराव मडावी आदिवासी साहित्यिक, यवतमाळ, मा सौ पुष्पाताई आत्राम आदिवासी लेखक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मा गीत घोष प्रगतशील विचारवंत तथा अध्यक्ष राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषद, मा रमेश मडावी अध्यक्ष आदिवासी सोशल फोरम, मा शैलेश सरपटवार इंजि. गडचांदूर, मा प्रा. डॉ गणेश माघाडे, मा, तुळशीराम पेंदोर, सेवानिवृत्त शिक्षक, मा अशोक नागभीडकर संचालक वसंत जिनींग व प्रेसिंग, मा राहुल आत्राम जिल्हाध्यक्ष क्रांतिवीर शामदादा कोलाम संघटना हे उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास गेडाम, सूत्रसंचालन वसंतराव चांदेकर तर आभारप्रदर्शन भाऊराव आत्राम करतील. 

या गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त, नव्याने प्रशासकीय नियुक्त व रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात येत आहे, हे विशेष...!

Post a Comment

Previous Post Next Post