सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : यवतमाळ जिल्हयात काल दिनांक ०८/०७/२०२५ रोजी रात्री ८ वाजतापासुन रिमझीम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु असुन सकाळी १० वाजता पर्यत सरासरी ३३.४० मी.मी. पाऊसाची नोंद झाली असुन १८ महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. तसेच केळापुर तालुक्यातील सायखेडा प्रकल्प १०० टक्के भरलेले असुन धरणाच्या भिंतीवरुन विसर्ग सुरु आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जिवितहानी होऊ नये, या करीता जिल्हा प्रशासनाचे वतीने मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाचे सूचना पुढीलप्रमाणे:
१. पुर सदृश्य परिस्थीती असलेल्या भागात शक्यतो जाणे टाळावे.
२. आकाशात विजा चमकत असल्यास सुरक्षीत स्थळी जावे. झाडाखाली थांबु नये.
३. नदी नाल्याच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्यास दुचाकी, चारचाकी, बैलगाडीने जाणे टाळावे.
४. जे रस्ते पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी गावस्तरीय समितीमधील कर्मचारी, कोतवाल यांना उपस्थित ठेवावे.
५. हवामान अंदाज याबाबत माहीती करीता सचेत अॅपचा वापर करण्यात यावा.
६. पुराच्या पाण्यात / धरण क्षेत्रात / पर्यटन ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, रिल बनविणे इत्यादी प्रकार टाळावे.
८. सर्व तालुका तहसिलदार यांनी त्यांचे नियंत्रण कक्ष चोवीस तास अलर्ट ठेवुन जिवित व वित्तहानी तसेच पुरपरिस्थीतीच्या अनुषंगाने आवश्यक मदतीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचे संपर्कात राहण्याचे सूचना केल्या केल्या आहे. याबाबत त्यांनी अहवाल वेळोवेळी सादर करावा, असे अनिरुद्ध बक्षी निवासी उपजिल्हाधिकारी यवतमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.