सर्वसामान्याच्या सदैव हितासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता अनिलभाऊ डोंगरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : समाजाला दारू व्यसनापासून व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडणारे अनिलभाऊ डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र तथा उपसरपंच यांचा 4 जून रोजी वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनहितार्थ कार्यक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला. 

अनिलभाऊ हे नेहमी जनतेच्या हिताचे उपक्रम राबवित असतात. नेत्र चिकित्सा शिबिर विद्यार्थ्यांना नोटबुक, शालेय बॅग, अभ्यासिका गरीब विधवा महिलांना साडी, वृद्ध लोकांना आधार काडी वाटप, शुद्ध आरो, पेजजल सेवा, अपंग निराधार यांना मदतीचा हात, इत्यादी कार्याच्या माध्यमातून सेवाभाव कार्य करणारे अनिलभाऊ डोंगरे यांनी आपला वाढदिवस खैरगाव येथील लोकनेते मा.आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ करून तसेच खैरगाव,विचोडा (बू) विचोडा (रई) येथील गरीब, विधवा महिला व वृद्ध लोकांना साडी,आधार काडी वाटप करण्यात आले. 

अनिलभाऊ डोंगरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्याकरिता समाजात समाजसेवा करणाऱ्या संघटना तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक जाती धर्माच्या समूहाच्या पुरुष,महिलांनी केक कापून स्वागत सत्कार शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा सौ.माधुरी सागोरे सरपंच, मा.विलासजी झटे सोशल मीडिया फेम, भाजप नेते काशिनाथ सिंह, ब्रिजभूषण पाजारे, सौ. लक्ष्मी सागर भाजप नेत्या, सौ.शोभाताई पिदुरकर, विजय आगरे, मनोज ठेंगणे, रमेश बुच्चे, वसंतराव महाले, नलगे ताई इत्यादी उपस्थित होते. 

वाढदिवसाचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्जुन नगरकर, विनोद खडसे, संगीता हेलवडे, रजनीताई ढुमणे, जयेंद्र ताजने, मनोज जाधव, प्रतीक मेश्राम, बबन पिंपळकर, गौरव गोहने, पियुष भोगेकर, विष्णू वरभे,  प्रमोद जाधव, ऑटो संघटनाचे पदाधिकारी राजू कुबेर, आकाश भेडारे, इत्यादीने परिश्रम घेतले. या कार्यक्रमात चंद्रपूर व तालुक्यातून शेकडोच्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व इतर समूहातील पुरुष महिला वर्ग उपस्थित होते.

स्वार्थ नसलेला गावच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारा सामाजिक मनाचा जनतेच्या हितासाठी संघर्ष करणारा श्री.अनिल डोंगरे हा सोन्यासारखा कार्यकर्ता
मा.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी व्हिडिओ माध्यमातून संभाषण करून त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...



Previous Post Next Post