Top News

अपार्टमेंट मधून दुचाकी नेली चोरून

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या रोज घटना घडू लागल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
चिखलगाव आर के अपार्टमेंट 1, मंगलम पार्क 1 येथील दुचाकी (क्रमांक एम एच 29 सी ई 4217) ही होंडा शाईन कंपनीची लाल व काळ्या रंगाची चोरून नेल्याची घटना 2 जून ला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता च्या दरम्यान घडली. याबाबत 5 जून रोजी शकील जमील शेख (वय 52, रा. आर के अपार्टमेंट 1,मंगलम पार्क 1, चिखलगाव) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने चोरून नेलेल्या या मोटारसायकल ची किंमत 70000/-रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मागील काही दिवसांत वणी सह शहरालगत असलेल्या भागातून दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. वाहन चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post