Top News

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन 3 जून रोजी वणी येथील वसंत जिनींगच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले.जिल्ह्यातील वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, बाभुळगाव, नेर,यवतमाळ,दिग्रस,पुसद,आर्णी या दहा तालुक्यातुन आलेल्या 122 प्रतिनीधींच्या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय विद्यालय,राजुरचे सेवानिवृत मुख्याध्यापक काॅ.पांडुरंग किन्हेकार यांनी केले. 

अध्यक्षमंडळात बाभुळगावचे जेष्ट नेते काॅ.गुलाबराव उमरतकर व दिग्रसचे जेष्ट नेते प्रसिद्ध पत्रकार काॅ.पि.जी.गावंडे उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राष्ट्रिय कौंसिल सदस्य काॅ.तुकाराम भस्मे(अमरावती) होते.तर अतिथी म्हणुन अ.भा.दलीत अधिकार आंदोलनचे जिल्हा सहसचिव काॅ.प्रदीप नगराळे (दिग्रस), अ.भा.आदीवासी महासभेचे जिल्हा समन्वयक काॅ.गंगाधर गेडाम (वणी),आयटकचे जिल्हाध्यक्ष काॅ.विजय ठाकरे (यवतमाळ), प्रा.धनंजय आंबटकर,ऋषी उलमाले (वणी),लक्ष्मणराव खंडारे,माजी सैनिक(दिग्रस),राज्य कौंसिल सदस्य दिपक माहुरे (बाभुळगाव), म.रा.किसान सभेचे राज्य कौंसिलर अनिल हेपट,राज्य कौंसिलर सुरेखा हेपट, जिल्हासचिव अनिल घाटे(वणी),आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे(यवतमाळ),aisf चे माजी नेते,बहुजन चळवळीचे कार्यवाहक मोहन हरडे प्रामुख्याने उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या अधिवेशनाचे मिनीटस् कमीटीचे काम अॅड.अरुण जवके व संजय भालेराव(यवतमाळ)यांनी पाहीले.उद्घाटन सत्रात काॅ.हिम्मत पाटमासे लिखित कविता संग्रहाचे तुकाराम भस्मे यांचे हस्ते विमोचन करण्यात आले.त्यानंतर प्रतिनिंधींच्या दुसरया सत्रात जिल्हासचिव अनिल घाटे यांनी जिल्हयाचा राजकिय व संघटनात्मक अहवाल सादर केला त्यावर प्रतिनिधींनी चर्चा केल्या.त्यानंतर प्रा.धनंजय आंबटकर यांनी विवीध ठराव मांडलेत व सभाग्रुहाची मंजुरी घेतली.पुढील तिन वर्षाकरीता अधिवेशनात 64 सदस्यीय जिल्हा कौंसिलची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रदीप नगराळे,आशीष पानघाटे,पवन भोयर,विलास आवारी,गिरीष पोलजवार,दत्तु कोहळे,गणेश कळसकर,गणेश पुराम(मारेगाव),गुलाब उमरतकर,दिपक माहुरे,विलास मडावी,गुरुदास लेनडे (बाभुळगाव),पि.जी.गावंडे,किशोर कदम,प्रदीप नगराळे, लक्ष्मण खंडारे,शरद मासुरकर(दिग्रस),ईश्वर दरवरे,हिम्मत पाटमासे,अॅड.अरुण जवके,संजय भालेराव,दिवाकर नागपुरे,विजय ठाकरे,ज्योतीताई रत्नपारखी,सुशील घोटेकार (यवतमाळ),दिलीप महाजन,रवी खाकरे,प्रशांत शेंडे (नेर),चिंतामण ईंगळे,मोतीराम गावंडे(आर्णी),वासुदेव गोहणे,अनिल भोयर, रामभाऊ उईके,गजानन पैसटवार, अरविंद भोयर (झरी), प्रविण आडे,दिनेश पारखी,अजय मेश्राम,सुरज पेंदोर,मधुकर केराम (राळेगाव), अमोल गौरशेट्टीवार,संतोष टमकेदार,खुर्शीद वजुद,साहेबराव राऊत,निखिल टोपलेवार,सुरेंद्र गडदे(पुसद),अनिल घाटे,अनिल हेपट,सुरेखा हेपट,सुनिल गेडाम,मोरेश्वर कुंटलवार,रवी गोरे,गंगाधर गेडाम,ऋषी उलमाले,अथर्व निवडिंग,पंढरी मोहीतकार,उत्तम गेडाम,प्रमोद पहुरकर,सुधाकर तुरानकर,सांभाशीव ताजणे,संतोष तितरे,मिलींद रामटेके,शैलेंद्र कांबळे,प्रा.धनंजय आंबटकर(वणी)यांचा समावेश आहे.नूतन जिल्हा कौंसिलने 11 सदस्यीय सचिव मंडळाची निवड केली. त्यामध्ये पि.जी.गावंडे,प्रदीप नगराळे(दिग्रस),दिलीप महाजन (नेर),प्रविण आडे (राळेगाव), गुलाबराव उमरतकर,दिपक माहुरे(बाभुळगाव),संजय भालेराव (यवतमाळ),अनिल घाटे,अनिल हेपट,सुनिल गेडाम,सुरेखा हेपट(वणी)यांचा समावेश आहे.

शेवटी अधिवेशनाने पुढील तिन वर्षाकरीता जिल्हा सचिवपदी अनिल घाटे(वणी),सह सचिवपदी संजय भालेराव (यवतमाळ) यांची फेरनिवड केली तर दुसरे सहसचिव म्हणुन प्रदीप नगराळे (दिग्रस), कोषाध्याक्ष म्हणुन गुलाबराव उमरतकर(बाभुळगाव)यांची निवड करुन समारोप करण्यात आला.अधिवेशनाची प्रस्तावना अनिल घाटे यांनी,संचालन सुनिल गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन पंढरी मोहीतकर यांनी केले.



Previous Post Next Post