Top News

राज ठाकरे यांचा वाढदिवस मारेगावात साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : महाराष्ट्र आणि पंचक्रोशीतील मराठी माणसासाठी तळमळ व अस्मिता जपणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आज मारेगावात साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी त्यांची मनसैनिकांनी आपुलकीने विचारपूस करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. अहमदाबाद मध्ये विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत संतोष रोगे यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करत आपली सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष रूपेश ढोके, शहर अध्यक्ष चांद बहादे,उदय खिरटकार, आकाश खामनकार, विजय रोगे, सिंधूताई बेसेकर, ढेंगळे ताई व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post