टॉप बातम्या

गुरुवारी वणी करांच्या सेवेत होणार लालपरी दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

 वणी : वणी आगाराला नवीन लालपरी बसेस मिळवण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने १५ दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, आता परिवहन मंत्र्यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मागणीची दखल घेतली असून वणी आगाराला नवीन ५ बसेस मिळाल्या असून त्या बसेस आणण्याकरिता आज रविवारी दुपारी चार वाजता चालक आणि वाहक दापोली (पुणे) येथे रवाना होणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांना एका पत्राद्वारे दिली. त्यामुळे सोमवारी होणारे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती राजु धावंजेवार मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष यांनी माध्यमाना दिली असून एसटी महामंडळाचे त्यांनी आभार मानले आहे.
वणी आगाराचे उत्पन्न हे यवत‌माळ जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे आहे.परंतु वणी आगाराचा डोलारा फक्त ३२ बसेसवर सुरु आहे. ३३ बसेस स्क्रैप झाल्या आहे त्यामुळे लालपरी ही धक्का परी बनली, लालपरीची डागडुगी करून टिनपत्रे लावले तरी जागोजागी पावसाळ्यात गळती होत असून चालक, वाहक आणि प्रवाशांना अतोनात हाल होत असल्याने अखेर मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी याची दखल घेतली आणि येत्या १५ दिवसात जर लालपरी न मिळाल्यास परिणामी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला व सोमवार दि ५ मे पासुन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण महाराष्ट्र-प्रदेश मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार हे करणार होते. परंतु महाराष्ट्राचे परिवहन मंत्री यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या आमरण उपोषणाची दखल घेवुन ५ नवीन लालपरी बसेस वणी आगाराला पाठविण्याचे एका पत्राद्वारे सांगीतले.त्यामुळे उद्या होणारे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असुन मानवी हक्क सुरक्षा परिषदेने एसटी महामंडळाचे आभार मानले.

Previous Post Next Post