डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था - अरुण भेलके

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजुर कॉलरी : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवजातीचा व भारतीय समाजाचा ऐतिहासिक अभ्यास करून भारतीय समाजातल्या बहुजन - शोषित - पीडितांना सांगितले की, ' तुमचे ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे दोन शत्रू आहेत...या शत्रूंचा नायनाट करण्याची क्रांतिकारी चळवळ केल्यानेच तुमची सर्व प्रकारचा शोषणातून मुक्ती होईल.' परंतु आपल्या देशात या दोन शत्रूंशी शोषित वर्ग मिळून लढण्याऐवजी कम्युनिस्ट आणि आंबेडकरी एकाकी लढले किंवा त्यांनी दुर्लक्षच केले.म्हणूनच आज हे दोन्ही शत्रू सत्तेवर विराजमान होऊन थैमान घालत आहेत." असे मत आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) सिटू चंद्रपूर चे जिल्हा संघटक कॉ. अरुण भेलके यांनी १मे जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन व ५ मे कार्ल मार्क्स यांच्या जयंती दिनानिमित्त येथील रमाई सभागृहात राजूर विकास संघर्ष समिती द्वारा आयोजित वैचारिक प्रबोधन कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. प्रसंगी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ता व आशा वर्कर सुनीता राहुल कुंभारे उपस्थित होत्या.

पुढे बोलताना कॉ.भेलके म्हणाले की, " मानवी सभ्यता, संस्कृती  विकासात कामगार चळवळीचा संघर्षमय योगदान राहिलेला आहे.कामगार चळवळीनेच शोषणमुक्त समाज निर्माणाचे आदर्श, प्रेरणा व ध्येय मानवजातीला दिले व यातूनच जनतेचे अनेक नायक, कलाकार, बुद्धिजीवी निर्माण होत राहिले. आज आपल्या देशात ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही संगनमताने फॅसिस्ट राज्य करीत आहेत. तेव्हा ह्यांना रोखण्यासाठी कम्युनिस्ट, पुरोगामी, लोकशाहीवादी व  आंबेडकरी चळवळींची आघाडी करून लढणे ही एक ऐतिहासिक जबाबदारी झालेली आहे. 

जनतेला महापुरुषांचे विचार पोहोचवून वास्तववादी परिस्थितीचे जाणीव करून देऊन त्यांच्या मध्ये पुरोगामी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावी हा उद्देश ठेवून येथील राजूर विकास संघर्ष समितीने प्रबोधन कार्यशाळेची माला सुरू केली असून दर शनिवारला विविध विषयांची महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने १ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचा निमित्ताने श्रम करणाऱ्या वर्गाचे प्रश्नच, त्यांचा चळवळीवर  दिनांक ३ मे रोजी प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली.
 
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी तर सूत्र संचालन महेश लिपटेसर यांनी केले, तसेच राहुल कुंभारे यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
 कार्यशाळेला प्रामुख्याने पीएचडी स्कॉलर पल्लवी धम्मप्रिय, पीएचडी स्कॉलर व शिक्षिका रक्षा अमोल वानखेडे, विजय तोताडे, सुनील सातपुते, प्रफुल मेश्राम, अर्चना मून, अल्का भोंगाडे, रजनी धोटे, ताई बलकी, सुकेशनी धाबर्डे, सुनीता वाळके, संजय कवाडे, ताई लोखंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था - अरुण भेलके डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था - अरुण भेलके Reviewed by सह्याद्री चौफेर on May 04, 2025 Rating: 5
Powered by Blogger.