संकेत नानाजी येलपूरवार यांची भारतीय रिज़र्व बँकेत "वर्ग अ अधिकारी" म्हणून निवड !

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भारतीय रिज़र्व बँकेच्या (RBI) पदोन्नती परीक्षेत यश मिळवून वणी येथील संकेत नानाजी येलपूरवार यांची क्लास वन ऑफिसर (Grade A Officer) पदासाठी निवड झाली आहे. ते सध्या मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. ही निवड संबंधित अधिकाऱ्याच्या सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि कार्यक्षमता याचे फळ मानली जात आहे.  

या पदोन्नतीमुळे त्यांना बँकेतील धोरणात्मक निर्णयांमध्ये अधिक सक्रिय भूमिका निभावता येणार आहे. रिझर्व बँकेच्या अंतर्गत आयोजित होणाऱ्या या परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक व कठीण मानल्या जातात.संकेत यांनी मागील चार वर्षांत विविध विभागांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या या यशामुळे बँकेत तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.  

बँकेतील सहकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नम्रतेने सर्वांचे आभार मानले व अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संकेत नानाजी येलपूरवार यांची भारतीय रिज़र्व बँकेत "वर्ग अ अधिकारी" म्हणून निवड ! संकेत नानाजी येलपूरवार यांची भारतीय रिज़र्व बँकेत "वर्ग अ अधिकारी" म्हणून निवड ! Reviewed by सह्याद्री चौफेर on May 04, 2025 Rating: 5
Powered by Blogger.