सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने परिवहनमंत्री मा. प्रताप सरनाईक यांचेकडे १५ दिवसापुर्वी मागणी करण्यात आली त्या निवेदनामध्ये १५ दिवसात लालपरी उपलब्ध न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु जनहितार्थ दिलेल्या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे व आजपावेतो वणी आगाराला नवीन बस न उपलब्ध झाल्यामुळे सोमवार ५ मे पासुन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार मानवी हक्क सुरक्षा परिषद हे आमरण उपोषण करणार आहे.
वणी आगाराला नवीन लालपरी बस मिळण्याकरिता सोमवारपासून मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे आमरण उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 03, 2025
Rating: