चोरट्यांनी लांबवली शेतकऱ्याची स्प्लेंडर

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरात घरफोडी असो की कोणती ना कोणती घटना असो, ऐकायला मिळतेच मिळते. आता एका शेतकऱ्याची हिरो कंपनीची मोटारसायकल चोरून नेल्याची घटना दि.14 मे ते 15 मे च्या कालावधीत उघडकीस आली. याबाबत 16 मे रोजी पोलिसात तक्रार करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
शहरातील सर्वोदय चौकातील संतोष किशन काकडे (49) या शेतकऱ्याची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर क्र.(एम एच 29-बि झेड -4495) ही दुचाकी मध्यरात्री च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांच्या पासून लांबवली. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध बि एन एस नुसार कलम 303(2) गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. 
चोरट्यांनी लांबवली शेतकऱ्याची स्प्लेंडर चोरट्यांनी लांबवली शेतकऱ्याची स्प्लेंडर Reviewed by सह्याद्री चौफेर on May 16, 2025 Rating: 5
Powered by Blogger.