सह्याद्री चौफेर| ऑनलाईन
मारेगाव : मार्डी येथील अमोल नारले यांचे दुःखद निधन झाले आहे.नारले कुटुंबीय हे गेल्या काही वर्षा पासुन मार्डी येथे वास्तव्यास होते. अमोलची आई, मार्डी येथील प्राथमिक केंद्रात कर्मचारी असल्यामुळे त्यांचे येथेच कायम स्वरुपी वास्तव्य होते. यापूर्वीच मोठा भाऊ आणि वडीलांचा मृत्यू झाल्या नंतर ही मायलेक दोघेच असतांना मागील पंधरवड्यात आईचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र, अमोलने चांगलाच धसका घेतला असतांनाच काल सायंकाळी पाच वाजता अमोलनेही जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मार्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. 15 मेच्या संध्याकाळी त्याचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी मार्डी येथील त्याच्या निवस्थानी आणला होता. काल 16 मेला त्यांचेवर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अविवाहित अमोलच्या पश्चात बहीण, भाऊजी, भाचे आहेत.
अमोल नारले यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2025
Rating: