सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
राजूर : नुकत्याच लागलेला इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल सर्व विद्यार्थी पालकांना समोरील दिशा कशी ठरवायची यासाठी वणी तालुक्यातील राजूर येथे दिनांक 17 मे 2025 शनिवार ला महिला मंडळ हॉल येथे सायंकाळी 6 वाजता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आणि प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या दर शनिवारला आयोजित करण्यात येत असलेल्या यावेळेसच्या कार्यशाळेला "विद्यार्थ्यांनी ध्येय कसे निवडावे आणि ते कसे गाठायचे!" या विषयावर मार्गदर्शक म्हणून मा. दिलीप मालेकर, युवा चेतना क्लब, वणी तसेच मा. वैभव ठाकरे, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, वणी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूर ग्राम पंचायत च्या सरपंच मा. विद्याताई डेव्हिड पेरकावार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रणिता मो.असलम, माजी सरपंच, राजूर, मा. हरिहर निमसटकर,शिक्षक, जि प शाळा, निंबाळा, मा. प्रकाश तालावर, शिक्षक, जि प शाळा, पठारपुर, मा. संजय धोबे सर, संचालक, रश्मी क्लासेस,राजूर मा. रक्षा वानखेडे, शिक्षिका, राष्ट्रीय विद्यालय, राजूर या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधन कार्यशाळा आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पडणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील अनेक आव्हाने उभे होत असताना अनेक परिवार मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करून मुलांचे भविष्य बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही जी मुले आई वडिलांच्या परिश्रमाची कदर करतात, परिस्थितीची जाण ठेवतात ती मुले पालकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ध्येय ठरवून स्वतःला अभ्यासात झोकून देतात आणि यश प्राप्त करतात. हे आपल्या गावात काही मुलांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून गावातील अन्य मुलांना मार्ग दाखवून दिला आहे.
आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे हे ठरविल्यावरच आपण त्यामार्गाने लागतो,त्याच प्रमाणे ध्येय निश्चित केल्याशिवाय ते ध्येय गाठण्यासाठी काय करावे लागेल हे ठरविता येत नाही. त्यासाठी कोणते पर्याय आपल्या समोर आहेत. १० वी १२ वी झाल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो, त्यामुळे भविष्यात करिअर घडविताना त्याचे काय फायदे होतील, त्याची तयारी कशी करायची, कोणते पुस्तके वाचायची, अभ्यास कसा करायचा अशी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण घेत असलेल्या ह्या प्रबोधन कार्यशाळेत देण्यात येणार आहे.
या प्रबोधन कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजूर विकास संघर्ष समितीच्या वतीने ॲड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटे सर, राहुल कुंभारे, जयंत कोयरे सर, सुनीता कुंभारे, नंदकिशोर लोहकरे, पल्लवी धम्मप्रिय, विजय तोताडे, सुनील सातपुते, विनायक येसंबरे, नागो काळे, अमित करमरकर आदींनी आवाहन केले आहे.
आज राजूर येथे विद्यार्थी प्रबोधन कार्यशाळा आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2025
Rating: