21 मे रोजी आदिवासींचा तहसील कार्यालयावर मोर्चा

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : हजारों आदिवासींचा तालुक्यातील आदिवासी वर होणाऱ्या अन्यायविरुद्ध व पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात वणी तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा धडकणार आहे.
वणी तालुक्यात सतत आदिवासी वर अन्याय होत आहे, व आरोपीना अभय देण्याचं कार्य पोलीस प्रशासन करतात असा आरोप आदिवासी बांधवाकडून प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. त्यामुळे आरोपीना अटक, पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन व नमूद तीनही प्रकरण तपास एस आय टी कडे पाठविण्यात यावा यासह इतर मागण्या मोर्चातून करण्यात येणार आहे.

तालुक्यातील पठारपूर येथील वृषभ गेडाम प्रकरण असो की, वणी शहरातील संग्राम गेडाम प्रकरण, वा करण शेडमाके प्रकरण असो. असे आदिवासी वर अन्याय होणारे बरेच प्रकरणे उघडकीस आले आहे,असं समस्त आदिवासी समाजाच्या आयोजन समिती कडून सांगण्यात येत आहे. वारंवार पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरोपीना अभय देण्याचं कार्य सुरूच असल्यामुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध आदिवासी समाज काही मागण्या प्रमुख घेऊन येथील उपविभागीय कार्यालय यांना निवेदन सादर करणार आहे. 
दि. 21/05/2025 रोजी सकाळी 11. 00 वाजता भीमालपेन मंदिर पाण्याच्या टाकी येथून खाती चौक, गांधी चौक गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, सुभाषचंद्र बोस चौक, टागोर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक ते तहसील कार्यालय असा मार्ग क्रमण असणार आहे. या मोर्चा मध्ये वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील समस्त आदिवासी समाजसेवक, सामाजिक, राजकीय तथा बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
21 मे रोजी आदिवासींचा तहसील कार्यालयावर मोर्चा 21 मे रोजी आदिवासींचा तहसील कार्यालयावर मोर्चा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 16, 2025 Rating: 5
Powered by Blogger.