सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मुंबई : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, पोलिसांवर कामाचा ताणही वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 9 मे रोजी राजपत्र जारी करून, पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार दिला आहे.
या अटींवर मिळणार तपासाचा अधिकार
संबंधित हेड कॉन्स्टेबल पदवीधर असावा
किमान 7 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथून 6 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे व परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील पोलीस दलासाठी दिलासा
शहरी भागात जरी अधिकाऱ्यांची संख्या समाधानकारक असली, तरी ग्रामीण भागात अपुऱ्या अधिकाऱ्यांमुळे तपास प्रक्रिया धीम्या गतीने चालते.अशा वेळी, प्रशिक्षित व पात्र हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे लहान-मोठ्या गुन्ह्यांचा प्राथमिक तपास सोपवण्यात येणार आहे.
या निर्णयाचे फायदे
• वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल
• गुन्ह्यांची उकल जलद गतीने होईल
• जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढेल
• पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदारी आणि संधी मिळेल.
हा निर्णय पोलिस यंत्रणेसाठी गेमचेंजर ठरू शकतो!
न्यायप्रक्रियेचा वेग वाढेल, तपास कार्यात परिणामकारकता येईल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा गृहखात्याने व्यक्त केली आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 16, 2025
Rating: