सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
जीवनातल्या प्रत्येक टप्प्याला एक नवा सूर्योदय असतो. आणि आज, या नव्या सूर्योदयाला साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण चि सौ का तृष्णा मारोती गौरकार आणि ग्रामगीताचार्य अडव्होकेट चि अतुल संभाजी खापणे यांच्या विवाह समारंभा प्रसंगी उपस्थित झाले. प्रेम आणि आशिर्वादांच्या या सागरात, दोन मनांचे संगम आज होताना आपण पाहत आहे. वैदिक संस्कृतीच्या पावित्र्यात, एक नवा अध्याय या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू होत आहे."आणि या नव्या अध्यायाला आपल्या शुभेच्छा आणि उपस्थिती आणि आशीर्वाद या ठिकाणी लाभले जात आहे, म्हणून मारोती गौरकार आणि संभाजी खापणे परिवाराच्या वतीने प्रत्येक पाहुण्यांचा मान्यवरांचा आप्तेष्टांचा नातेवाईक इष्टमित्र सगेसोयरे या सर्वांच सहर्ष मनःपूर्वक स्वागत चि सौ का तृष्णा व चि अतुल यांचा आदर्श विवाह सोहळा गुरूदेव सेवा मंडळाच्या वैदिक पद्धतीने धार्मिक वातावरणात समधुर संगीत साई प्रकाश म्युझिकल ग्रुप प्रकाश पिंपळकर व संच यांच्या सुगम संगीतात पार पडला.
या सोहळ्याला माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र, मा. श्री वामनरावजी कासावार माजी आमदार वणी, विधानसभा क्षेत्र माननीय श्री संजीव रेड्डी बोदकुरवार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र, सौ किरण ताई देरकर अध्यक्ष महिला बँक वणी मा. श्री नरेंद्र ठाकरे अध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, सौ अरुणाताई खंडाळकर माजी सभापती महिला व बालकल्याण जि प यवतमाळ, मा. श्री आशिष भाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वणी, मा. श्री देविदास जी काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था वणी, मा. श्री गौरीशंकर खुराना सभापती कृषी उत्पन्न बाजार मारेगाव, मा. श्री भास्करराव ढवस माजी सदस्य जि प यवतमाळ, मा. श्री मुकेश जी जीवतोडे शिवसेना नेते वरोरा, मा. श्री संजय भाऊ खाडे वसंत जीनिग संचालक वणी,मा. श्री राजाभाऊ कासावार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी,टिकाराम कोंगरे माजी अध्यक्ष य.जि.म. बँक यवतमाळ,अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ संध्याताई बोबडे, शहराध्य महिला काँग्रेस कमिटी वणी, शामाताई तोटावार गुरुकुंज आश्रम मोझरी येथून सर्वाधिकारी श्री लक्ष्मणजी गमे सर, प्रचारक रुपलालजी कावळे सर,ईश्वर पाटील घानोडे दादा, श्री गुणवंत दादा कुत्तरमारे, श्री विशालजी गावंडे सर, श्री गजानन दादा डंभारे व गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत पाहुणे उपस्थित होते.
विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता तथा तालुका काँग्रेस कमिटी चे मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती माधवराव गौरकार हे गुरुदेव प्रेमी असल्यामुळे त्यांनी महाराजांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांनी आपल्या थोरल्या मुलीच्या लग्न प्रसंगी वैदिक विधींची संकल्पना राबविली.तसेच जावई सुद्धा ग्रामगितचार्य असल्याने हा सोहळा शक्य झाले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विवाह संस्कार या अध्याया मध्ये विवाहाची व्याख्या खूप सुंदर करतात ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती,चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा,स्त्रीपुरुष ही दोन चाके । जरि परस्पर सहायकें । तरीच संसाररथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श|
या विवाह सोहळ्यानंतर आर्या कुत्तरमारे हिने राष्ट्रवंदना घेतली. या विवाह सोहळ्यानंतर आर्या कुत्तरमारे हिने राष्ट्रवंदना घेतली विवाह सोहळ्यात येणाऱ्या उपस्थित प्रत्येक पाहुण्यांचे आदरतिथ्य ग्रामगीता व संविधान देऊन या परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला.
गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्व प्रणाली नुसार आदर्श विवाह सोहळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 23, 2025
Rating: