टॉप बातम्या

शहरातील रस्ते झाले बिकट, दुरुस्तीची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष न करता याकडे जातीने लक्ष देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी व उर्वरित कामे पावसाळा लागण्यपूर्वी तातडीने काम सुरु करावे, अशा आशयचे निवेदन प्रहार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मोबीन शेख यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, पावसाळा तोंडावर आलेला असताना अजून पर्यंत शहरातील टिळक चौक ते इंदिरा चौक तसेच साई मंदिर ते नांदेपेरा रोड या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशी व सामान्य नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर शाळा महाविद्यालय मोठ्या प्रमाणात असून विद्यार्थ्यांचे आवागमन मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्याच्या दुरावस्थामुळे दुचाकी स्वारांना तारेवरची कसरत करून मार्गक्रमन करावे लागतेय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कामे पूर्ण करण्यात यावी. अशी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांनी मागणी केली आहे. 
या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर रघुवीर कारेकर,जयंत उईके यांच्या स्वाक्षरी आहेत.
Previous Post Next Post