सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : पोलिसांनी अवैध गोवंश तस्करीवर मोठा आघात करत १५ नर जातीच्या गोवंश जनावरांची सुटका केली असून सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत नागपूर येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात गोवंश तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे.दि.११ मे रविवार रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक.रमाकांत खंदारे हे आपल्या पोलीस पथकासह नियमित गस्त घालत असताना गोपनीय माहितीनुसार एक अशोक लिलॅण्ड ट्रक क्रमांक एम.एच.४० सी.टी.२९५४ मधून अवैध गोवंश तस्करी होत आहे अश्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी केळापूर टोल नाक्यावर तात्काळ नाकाबंदी केली आणि संशयित ट्रक थांबवून तपासणी केली असता,ट्रकमध्ये १५ नर जातीच्या गोवंश जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने क्रूरतेने बांधून ठेवल्याचे आढळून आले.तपासात उघड झाले की,ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणातील साठापूर येथे नेण्यात येत होती.पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका केली.या जनावरांचे वय अंदाजे ०५ ते १० वर्षांदरम्यान आहे.सुटलेली सर्व जनावरे सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.आसिफ सुलतान कुरेशी वय ४८,रा.आझाद नगर,टेका नाका,नवीन वस्ती,नागपूर,शेख बब्बू शेख मुसा वय ३८,व्यवसाय चालक,रा.पिली नदी,परवेझ नगर,टेका नाका,कामठी रोड,नागपूर,आकिब मोहम्मद आरिफ कुरेशी वय २२,व्यवसाय व्यापारी,रा.आझाद नगर,टेका नाका,नवीन वस्ती,नागपूर या तिघांविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये पो.कॉ.गौरव नागलकर यांच्या सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्र. ४१०/२०२५ अन्वये महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५) कलम ५,५(अ),५(ब),९ आणि प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यापासून संरक्षण अधिनियम १९६० च्या कलम ११ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ३ लाख रुपयांची किंमत असलेली १५ गोवंश जनावरे आणि अंदाजे १७ लाख रुपये किंमतीचा अशोक लिलॅण्ड ट्रक असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे,पोलीस अंमलदार प्रफुल्ल पावसेकर आणि पो.कॉ.गौरव नागलकर यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गोवंश तस्करीवर आळा बसण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
२० लाख रुपयांचा मुद्येमालासह गोवंश तस्करी उघड : १५ जनावरांची सुटका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 12, 2025
Rating: