दारूबंदीसाठी नारीशक्तीचा एल्गार...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या मार्डी बिट मधील चिंचमंडळ येथे अवैध दारु विक्रीला उधाण आले असुन गावात शांतता भंग होण्याच्या मार्गांवर आहे. त्यामुळे ही अवैध दारु विक्री तत्काळ बंद करावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन येथील महीलांनी पोलीसांना दिले आहे.
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मार्डी बिट मध्ये गेल्या अनेक महिण्या पासुन अवैध दारु विक्रीला उधाण आले आहे. चिंचमंडळ, चोपन,वनोजा, मजरा, केगांव व वनोजा देवी स्टॉप डोलडोंगरगांव कडील रस्ता ईत्यादी ठिकाणे अवैध दारु विक्रीचे केंद्र असुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या अवैध दारु विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे.त्यामुळे आता खुलेआम अवैध दारुचे व्यवसाय फोफावले असल्यामुळे गावातील शांततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चिंचमंडळ येथे या अवैध दारु व्यवसायाचा उद्रेक वाढला असल्याने नविन पिढी व्यसनाधीन होत आहे. गावात रोज झगडे भांडणे होत असल्यामुळे महिलांनी पुढाकार घेत ही अवैध दारु विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी एका निवेदनातुन केली आहे.
निवेदनावर सरपंच वैशाली परचाके,कविता पालकर, सुचिता कामतवार, विद्या मोरे, अनिता चाफले, मोनिका बुट्टे, योगीता दानव, उषा राऊत, मंदा कुचनकार, मिरा कामतवार, बिंद्या शेडमाके, रत्नमाला मेश्राम, ज्योती दानव, निर्मला सिडाम, रेखा मेश्राम, किरण दुपारे, सिमा भोयर, सपना नागपुरे, आश्वीनी पालकर, शरीफा पठाण, कल्पना दानव, अंजना सिडाम, प्रिती पचारे, संगिता सोनटक्के, प्रणाली पचारे, रंजना सिडाम, सविता वानखडे, गिता खैरे, अल्का पचारे,बेबी वानखडे ईत्यादी महीलाच्या सह्या आहे.
दारूबंदीसाठी नारीशक्तीचा एल्गार... दारूबंदीसाठी नारीशक्तीचा एल्गार... Reviewed by सह्याद्री चौफेर on May 11, 2025 Rating: 5
Powered by Blogger.