भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेपेरा (पोहणा) अध्यक्षपदी सुरेश शेंडे व सचिवपदी राहुल ठमके यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

नांदेपेरा : दर तीन वर्षांनी येथील जेतवन बुद्धविहार नांदेपेरा येथे भारतीय बौद्ध महासभा तथा रमाबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात येऊन शाखा अध्यक्ष म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे व सचिवपदी राहुल ठमके निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील बुद्धविहारांचे व्यवहार व व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालविता यावे याकरिता जास्तीत जास्त वुद्धविहार भारतीय बौद्ध महासभा चे अंतर्गत चालविल्या जातात. त्या अनुषंगाने नांदेपेरा येथील जेतवन बुद्धविहार ची दर तीन वर्षांनी होणारी नवीन कार्यकारिणीची निवड येथील बौद्ध बांधवांचा व रमाबाई महीला मंडळ यांचा उपस्थितीत करण्यात आली.

या पुढील तीन वर्षां करिता नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सुरेश शेंडे, उपाध्यक्षपदी सुखदेव येरेकर, सचिवपदी राहुल ठमके, सहसचिवपदी यादव वानखेडे, कोषाध्यक्षपदी महादेव पाटील यांचा समावेश आहे.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीदिनी गावातील सर्व बौद्धबांधव, उपासक, उपासिका, रमाई महिला मंडळ यांचे उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच मंगलमय दिनाचे औचित्य साधून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे ह्यांच्या निवडीने बौद्ध बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी जेतवन बुद्ध विहार नांदेपेरा येथे सर्व बौद्ध बांधवांना सोबत घेऊन अनेक चांगले उपक्रम राबवून नवीन दिशा देण्यात येईल असे सांगितले.


भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेपेरा (पोहणा) अध्यक्षपदी सुरेश शेंडे व सचिवपदी राहुल ठमके यांची निवड भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेपेरा (पोहणा) अध्यक्षपदी सुरेश शेंडे व सचिवपदी राहुल ठमके यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on May 13, 2025 Rating: 5
Powered by Blogger.