सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म दिवस ग्रामजयंती म्हणून देशभरात साजरी करण्यात येते. अशीच "ग्राम जयंती" कानडा येथे गट ग्रामपंचायत कानडा चे वतीने 'एक पाऊल गावांसाठी' या मथळ्याखाली दि. २४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत साजरी करण्यात आली.
महाराजांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना ग्रामगीता हा ग्रंथ लिहून अर्पण केला व ग्रंथामधे अग्रस्थानी शेतकरी शेतमजूर व गावं हेच अग्रस्थानी आहे.
सर्व ग्रामासी सूखी करावे | अन्न वस्त्र पात्रादि द्यावे||परी स्वताची दूख भोगावे| भूषण तूझे ग्राम नाथा||
असा उल्लेख केला. यामधे ग्रामस्वच्छता करण्यात आली. शेतीविषयक मार्गदर्शन, गांडूळ खत निर्मिती याबाबत आशिष लोडे यांनी मार्गदर्शन केले. वृक्षसंवर्धन विषयांवर जनजागृती, हागणदारीमुक्त गाव, महिला सक्षमिकरण, ग्रामसभा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
खरे काम निष्काम हि ग्रामसेवा |झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा ||कळो हे वळो देह कार्यी पडू दे|घडू दे प्रभू एवढे हे घडू दे||
असा संकल्प केला. त्यानंतर सामूदायिक प्रार्थना व मनोगत व्यक्त करण्यात आले.
हा कार्यक्रम संरपच सौ सुषमा रूपेश ढोके यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य कविता झिले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र चामाटे, गूरूदेव सेवा मंडळाचे पंढरी येवले, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोसाई आत्राम, माजी सरपंच प्रमोद धोबे, अरूण आस्कर, वंदना येवले, संगीता येवले व गावातील नागरिक उपस्थित होती. संचालन ग्रामधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी, प्रास्ताविक रूपेश ढोके तर, आभार सुरज येवले यांनी मानले.
कानडा येथे थाटात पार पडला ग्राम जयंती महोत्सव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2025
Rating: