महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे वतीने डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजुर कॉलरी : जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंचा सौ. विद्याताई डेव्हिड पेरकावार यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट देण्यात आली.

राजुर ग्रामपंचायत द्वारे चालविल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रात येथील विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येऊन अभ्यास करून यश मिळवित आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आणि त्यांना लागणारी लेटेस्ट पुस्तके ग्रामपंचायत द्वारे उपलब्ध करून देण्यात आले.

या दोन्ही प्रसंगी प्रामुख्याने मा. अशोकभाऊ वानखेडे, मा. अशोकभाऊ भगत, मा. सौ. प्रणिताताई मो. असलम, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य, मा. सौ. पायलताई अनिल डवरे ग्रा. पं. सदस्य, मा. कु. चेतनाताई यशवंत पाटील ग्रा. पं. सदस्य, मा. सौ. बबिताताई रामेश्वर सिंह, ग्रा. पं. सदस्य, मा. डॉ. तेजस आस्वले, वैद्यकीय अधिकारी. प्रा. आ. केंद्र राजूर, मा. डेव्हिड भाऊ पेरकावार, मा. कुमारभाऊ मोहरमपुरी, मा. अनिल डवरे, मा. रामलुअण्णा बोलगमवार, मा. यशवंत पाटील, मा. गोवर्धन दुर्योधन, मा. पुरुषोत्तम फुलेझेले, सचिव ग्रा. पं. राजूर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी व गावातील ग्रामस्त उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे वतीने डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे वतीने डॉ. आंबेडकर अभ्यासिकेला ग्रामपंचायत तर्फे पुस्तके भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on May 01, 2025 Rating: 5
Powered by Blogger.