सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी तालुक्यात आत्महत्येचा आलेख थांबता थांबत नसतांना आज बुधवारी ला शास्त्री नगर येथील विवाहित तरुणाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना दुपारी अडीज वाजता उजेडात आली.
जावेद शहा अहेमद शहा (38) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यूज पेपर वाटून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. आज दि. 30 एप्रिल रोजी जावेद हा अक्सा मस्जिद चे कब्रस्तान मधील लोखंडी इलेट्रिक पोल ला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले.त्याच्या अशा निधनाने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून मृतक जावेद यांच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
शास्त्री नगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 30, 2025
Rating: