राजूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : ग्रामपंचायत राजूरद्वारे चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राला एक मानाचे यश लाभले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासिकेचा विद्यार्थी प्रशिक अजय कांबळे याची यशस्वी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे, राजूर येथीलच शिरीष वसंता मेंढे यांची देखील MPSC परीक्षेत निवड झाली असून, त्यांनी स्वतंत्ररीत्या अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

या यशाचे औचित्य साधून दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र, राजूर कॉलरी येथे प्रशिक कांबळे याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत राजूरच्या सरपंच सौ. विद्याताई डेव्हिड पेरकावार, माजी पंचायत समिती सदस्य अशोकभाऊ वानखेडे, डेव्हिडभाऊ पेरकावार, कॉ.ॲड. कुमारभाऊ मोहरमपुरी, अनिलभाऊ डवरे, रतन दारुंडे,यांचे समवेत अभ्यासिकेतील विद्यार्थी स्नेहल वाळके, बिल्डर वावरे, सतीश भुसारी,अमृत मोहरमपुरी, पीयूष कांबळे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

प्रशिक कांबळे याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिरीष मेंढे हे बाहेर असल्यामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना सरपंच सौ. विद्याताई पेरकावार यांनी अभ्यासिकेच्या कामगिरीचे कौतुक करताना प्रशिक कांबळे याचे अभिनंदन केले. तसेच अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांना अशीच यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभ्यासिकेला अधिक पुस्तके पुरवण्याचे आश्वासन दिले.
राजूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश राजूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे घवघवीत यश Reviewed by सह्याद्री चौफेर on April 20, 2025 Rating: 5
Powered by Blogger.