सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : निलजई बेलोरा परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्याबाबत दि.28/3/25 रोजी निवेदन देऊन कळविले व तशी चर्चा संबधित अधिकरयासोबत केली होती. परंतु कंपनीने अजूनपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही. कंपनी राजकीय दबावाखाली किंवा ओळखी पाळखीच्या युवकांना रोजगार देतात व ज्या युवकांना रोजगाराची गरज असतांना त्याची ओळख किंवा राजकीय जवळीक नसेल तर त्याला नौकरीत समावून घेत नाही. अशा युकावर उपासमारीची वेळ येत आहे.
डब्लू. सि. एल.ने परिसरातील शेतींचे अधिग्रहण केल्यामुळे व शेतमजुरी हा व्यवसाय गेल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला कामेसुद्धा राहीली नाही,दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे स्थानिक गरजू युवकांना रोजगार देणे ही कंपनीची सामाजिक व कायदेशीर जबाबदारी आहे. याची जाणीव भाकपने कंपनीस अनेक वेळा करून दिली. परंतु कपनीने कोणतेही म्हणणे ऐकूण घेण्यास तयार नाही. म्हूणन परिसरातील सर्व बेरोजगार युवक भारतीय काम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात दि. 25/4/2025 ला सकाळी 11वाजेपासून कंपनीच्या कार्यालयासमोर "बेमुदत धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदन सर्व बेरोजगार युवक व शेतमजुरातर्फे भाकपचे काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवींद्रभाऊ गोरे, काॅ.दीपक, काॅ.पंढरीभाऊ मोहितकर, काॅ.दिनेशभाऊ शीटलवार, काॅ.मिलिंद रामटेके, राज्य कौंसिलर काॅ.सुनिल यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी,पोलिस स्टेशन शिरपुर व संबधित कंपनी व्यवस्थापनास दिले.
जि.आर.एन.कंपनी निलजई बेलोरा येथील स्थानिक बेरोजगारांना नौकरी द्या - भाकप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 20, 2025
Rating: