नत्थुजी खानझोडे अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे वडील श्री नत्थूजी बापूराव खानझोडे यांचे दि.19 एप्रिल रोजी दुपारी 4.00 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षाचे होते.

वणी तालुक्यातील राजूर (कॉलरी) वार्ड नं 3 मधील सर्वांच्या परिचयातील मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आठ दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते.

शनिवारी त्यांचं दुःखद निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर रविवार दि. 20 एप्रिल ला सकाळी 12 वाजता राजूर (कॉलरी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्व. नत्थू जी खानझोडे यांचे पाठीमागे 3 मुलं, स्नुषा, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
नत्थुजी खानझोडे अनंतात विलीन नत्थुजी खानझोडे अनंतात विलीन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 20, 2025 Rating: 5
Powered by Blogger.