सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वीज वितरण कंपनीची अनियमित वीज पुरवठा, वारंवार बत्तीगुल, तसेच ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हे आता तालुक्यात सार्वजनिक स्तरावर चर्चा आणि तीव्र नाराजीचा विषय बनला आहे.
मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील इलेक्ट्रिक काही हवा, पाणी किंवा काही कारण नसतानाही दररोज बत्ती गुल होत आहे. ऐन विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दिवस आहे. आणि वीज वितरण विभागाकडून अघोषित लोडशेडींग सुरु आहे. परिणामी ग्रामीण मुलांच्या शिक्षणात मोठा कमालीचा व्यत्यय निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. दिवसा तर लाईट येरजाऱ्या मारतातच,परंतु रात्री सुद्धा तासंतास "बत्ती गुल" असते. लोकांची इलेट्रिक, इलेक्ट्रॉनिक साधनं वाकुल्या दाखवत आहे. तर कधी अचानक अति विद्युत दाबमुळे घरगुती उपकरण बिघडत आहे. याचा भ्रूदंड नागरिकांनाच सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील डिजिटल शिक्षणाचा सावळा गोंधळ उडाला आहे. शेतकरी त्रस्त झाला आहे. एक्स्ट्रा क्लास ओस पडत आहे. या सर्व बाबीकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी मात्र, का बघ्याची भूमिका घेत हेच कळायला मार्ग नाही. जन प्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे असा प्रश्न देखील आपसूकच उपस्थित होत आहे.
वीज वितरण कंपन्यांकडून वारंवार वीज खंडित केल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याचा परिणाम उद्योग, व्यवसाय आणि सामान्य जीवन यांवर होतो. त्यामुळे मारेगाव तालुक्यात सर्व सामान्यांचा 'कोणी वाली आहे कीं नाही' असा तीव्र नाराजीचा सुरु उमटत असून सध्या शैक्षणिक तरी काळात बत्ती गुल राहूच नये अशी मागणी जोर धरत आहे.
साहेब... परीक्षेचे दिवस आहे... आणि तुमची सतत "बत्ती गुल", काही तरी विचार करा!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 20, 2025
Rating: