सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि.24 एप्रिल रोजी मारेगाव येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या उपस्थितीत तहसीलदार उत्तम निलावाड यांनी जाहीर केली. 2025 ते 2030 अशा पाच वर्षांच्या कालावधीत निवडणूक होणार आहे. आरक्षण सोडतीमुळे 'काही ठिकाणी खुशी, तर काही ठिकाणी गम' दिसून येत आहे. यातील सुमारे 50 ग्रामपंचायती वर महिला राज येणार असल्याने अनेकांचे आचार विचारात बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामध्ये अनुसुचीत जाती, जमात, व ईतर मागास वर्गीयाचा प्रवर्ग, तथा सर्वसाधारण गटातील महीलांचा समावेश आहे. 2025 ते 2030 या कालावधीत पार पडणाऱ्या निवडणुका मध्ये 56 ग्रामपंचायतीचा समावेश असुन सर्वांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नियमावली तयार करुन आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या जाहीर झालेल्या आरक्षणात अनेकांना धक्का बसला असुन अनेकांना खुशी झाली तर काहींना दुखवटा आहे.
वनोजा अनुसुचीत जात, आकापुर अनुसुचीत जमाती, करणवाडी अनुसुचीत जमाती, टाकळखेडा अनुसुचीत जमाती महिला, गौराळा, अनुसुचीत जमाती महिला, कोलगाव, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग, चिंचमंडळ नागरिकांचा मागासवर्गीयांचा प्रवर्ग, मजरा ना.मा.प्र., कोथुर्ला ना.मा.प्र.,खैरगाव बुट्टी ना.मा.प्र. महीला, टाकळी ना.मा.प्र. महिला, सावंगी सर्वसाधारण, सिंधी सर्वसाधारण, वेगाव सर्वसाधारण, शिवणी धोबे सर्वसाधारण, हिवरा सर्वसाधारण, नवरगाव सर्वसाधारण, केगाव सर्वसाधारण, देवाळा सर्वसाधारण, ईंदिरा ग्राम सर्वसाधारण, गाडेगाव सर्वसाधारण महिला चोपण सर्वसिधारण महिला, दांडगाव सर्वसाधारण महिला, बोरी बू सर्वसाधारण महिला, आपटी सर्वसाधारण महिला, कोसारा सर्वसाधारण महिला, हिवरी सर्वसाधारण महीला, मार्डी सर्वसाधारण महिला, किन्हाळा सर्वसाधारण महिला, कुंभा सर्वसाधारण महिला, मांगरुळ सर्वसाधारण महिला, पिसगाव अनुसुचीत जमाती, घोगुलदरा अनुसुचीत जमाती, बोरी खु. अनुसुचीत जमाती, शिवनाळा अनुसुचीत जमाती, वरुड अनुसुचीत जमाती, गोधणी अनुसुचीत जमाती, अर्जुनी अनुसुचीत जमाती, डोल डोंगरगाव अनुसुचीत जमाती, हटवांजरी अनुसुचीत जमाती, घोडदरा अनुसुचीत जमाती, बुरांडा (ख.) अनुसुचीत जमाती, नरसाळा अनुसुचीत जमाती महिला, पहापळ अनुसुचीत जमाती महिला, चिंचाळा अनुसुचीत जमाती महिला, बोटोणी अनुसुचीत जमाती महिला, सगणापुर अनुसुचीत जमाती महिला, वागदरा अनुसुचीत जमाती महिला, जळका अनुसुचीत जमाती महिला, मच्छिंद्रा अनुसुचीत जमाती महिला, कान्हाळगाव अनुसुचीत जमाती महिला, सराटी अनुसुचीत जमाती महिला, खंडणी अनुसुचीत जमाती महिला, म्हैसदोडका अनुसुचीत जमाती महिलांचा समावेश आहे.
मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले, तहसीलदार उत्तम निलावाड, नायब तहसीलदार, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, उपस्थित होते.
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, "कही खुशी कही गम"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 26, 2025
Rating: