खेळण्यातून घालवा मुलांचे नैराश्य...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : डॉक्टरांच्या मते जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच खेळण्यातून मुलांचे नैराश्य घालवा असे आरोग्य तज्ञ सांगतात.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार संशोधनानुसार किशोरवयीन मुले रोज काही वेळ हलका व्यायाम करतात त्यांना पुढे आयुष्यात त्याचा फायदा होतो. जी मुले १२ ते १६ या वयात आठवड्याला कमीत कमी तीन दिवस हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करतात त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण फार कमी असते, असे एका अभ्यासात दिसून आले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. डॉक्टरांच्या मते बसून राहण्यापेक्षा काहीतरी शारीरिक हालचाली जी मुले करतात त्यांना पुढे आयुष्यात त्यांचा फायदा होतो. सांगण्यानुसार किशोरवयीन डॉक्टरांच्या काही मुलांचा करण्यात आलेल्या अभ्यासानुसार

जी मुले १२ ते १६ या वयात आठवड्यातून हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करीत असतात त्यांच्यात नैराश्य कमी दिसून आले आहेत. डॉक्टरांच्या मते यात फार मोठ्या व्यायामाची आवश्यकता नसते तर साध्या शारीरिक हालचाली गरजेच्या असतात लक्ष न लागणे नूर बदलणे यासारख्या गोष्टी शारीरिक हालचाली करणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये कमी दिसून येतात जर बारा ते सोळा या वयातील मुले नेहमीपेक्षा एक तास जास्त एकाच ठिकाणी बसून राहत असेल तर त्यांच्यात नैराश्य वाढण्याचे प्रमाण जास्त असते. 

१२ ते १६ या सर्व वयोगटातील मुलांनी जर जास्त काळ बसून काढला तर त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण अधिक दिसून येते डॉक्टरांच्या मते किशोरवयीन काळात एकाच ठिकाणी बसून राहण्याच्या सवयीने तारुण्यात पदार्पण करताना निराशाचा त्रास होऊ शकतो म्हणूनच किशोरवयीन मुलांनी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून न राहता हलका व्यायाम व शारीरिक हालचाली करून खेळण्यात अधिक वेळ घालवला तर खेळातून नैराश्य घालवता येते,असे आरोग्य तज्ञ सांगतात.
खेळण्यातून घालवा मुलांचे नैराश्य... खेळण्यातून घालवा मुलांचे नैराश्य... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 27, 2025 Rating: 5
Powered by Blogger.