ग्रामपंचायत माथार्जून अंतर्गत डुबली पोड येथे शुद्ध ऑरो केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : झरी तालुका आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या सर्वात जास्त आहे. त्याच पैकी आदिम जमाती कोलाम पोड एकूण अंदाजे ५९ पोडे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

माथार्जून ग्रामपंचायत मध्ये एकूण ५ पोड आहेत. गारगोटी, बिहाडी पोड, दुबली पोड, चिचपोड, चिचपोड (लहान) त्यापैकी डुबलीपोड येथील लोक कित्येक वर्षापासुन विहिरीचे पाणी वापरायचे त्या मुळे किडनीच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. या क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी च्या आजाराने येथील काही एक ते दोन व्यक्ती दगावली होती.

ग्रामपंचायत २०२२ निवडणुकीमध्ये प्रचार दरम्यान डुबलीपोड येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये असणाऱ्या माजी सरपंच उपसरपंच यांना समस्या सांगून सुद्धा कोणतीही उपाययोजना केल्या नव्हत्या.

पणमात्र,आज रोजी सरपंच रवींद्र बाबुराव कायतवार यांच्या पुढाकाराने डुबली पोड येथे जल शुद्ध यंत्रणा उभारले गेले. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ३ मधील सदस्य यांनी सरपंच यांचे आभार मानले. जल शुद्ध यंत्रणेचे उद्घाटन सरपंच रवींद्र कायतवार यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळेस गावातील ग्राम पंचायत सदस्य अय्या कुमरे, जिल्हा परिषद शिक्षक विलास किनाके, शिक्षक राजू सिडाम. प्रतिनिधी योगेश मडावी, निलेश मडावी, राजकुमार कुमरे, व गावातील नागरिक उपस्थित होते.
ग्रामपंचायत माथार्जून अंतर्गत डुबली पोड येथे शुद्ध ऑरो केंद्राचे उद्घाटन ग्रामपंचायत माथार्जून अंतर्गत डुबली पोड येथे शुद्ध ऑरो केंद्राचे उद्घाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 29, 2025 Rating: 5
Powered by Blogger.