जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

यवतमाळ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, विकास मींना,यवतमाळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, शाळा, कॉलेज शिक्षक, मंडप संचालक, मेकअप आर्टिस्ट, पंडित, मौलवी व महिला व बाल विकास अधिकारी, यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी मींना यांनी सांगितले.

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास 1098 हा टोल-फ्री नंबर आहे. या क्रमांक वर संपर्क साधवा असें आवाहन त्यांनी संदेशातून केले आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर  बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2025 Rating: 5
Powered by Blogger.