वाळूचा ट्रॅक्टर पकडला; 3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वाळू ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत 6 हजार किमतीची 1 ब्रास वाळू व 3 लाख रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण 3 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार (दि.30) ला पहाटे 3.15 वा.करण्यात आली.

या प्रकरणी पोउपनि सुदाम आसोरे  (पोलीस स्टेशन वणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयीत आरोपी विवेक वसंता अवधान (वय 40 वर्ष रा. सावर्ला ता.वणी), यांचे विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विवेक अवधान हे विनापरवाना अवैध्यरित्या वाळूची वाहतुक करताना मिळुन आले. दरम्यान त्यांचे ताब्यातुन महिंद्रा कंपनीचे (Mahindra 575 di sp plus) लाल रंगाचा मुंडा ज्याचा चेचीस नंबर (MBNTFAKAPMNL00469) व ट्रॉलीचा क्र. एम एच 29 एम 4283 (किं.300000 रुपये) असा दिसून आला. सदर ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू (किं. 6000 रुपये) असा एकुण 306000 रु.चा मुद्देमाल मिळुन आला. आज बुधवारी पंचासमक्ष घटनास्थळी जप्तीचा पंचनामा तयार करण्यात आला. त्याचेवर वणी ठाण्यात बिएनएस नुसार कलम 303(2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वणी यांचे आदेशानुसार पोउपनि सुदाम आसोरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल यांनी केली.
वाळूचा ट्रॅक्टर पकडला; 3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त वाळूचा ट्रॅक्टर पकडला; 3 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2025 Rating: 5
Powered by Blogger.