हरवलेला मोबाईल वणी पोलिसांकडून मूळ मालकाला परत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलिस स्टेशन च्या हद्दीतून एका नागरिकाचा हरवलेला मोबाईल वणी पोलिसांकडून त्याला परत करण्यात यश आले आहे. आपला गहाळ झालेला मोबाईल पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे संबंधित मालकाच्या चेहऱ्यावरून आनंद द्विगुणित झाला.

मेहनती च्या पैशातून हजारो रुपये घालून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाला की, आपण हताश होऊन तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. औपचारिकता म्हणून पोलिसांत तक्रार नोंदविली जाते. मात्र, अशाच दाखल झालेल्या तक्रारीचा छडा लावून वणी पोलिस स्टेशनच्या पथकाने 17 जानेवारी 2024 रोजी हरवलेल्या मोबाईल (C.E.I.R) वरून शोधून ते दि. 01/04/2025 रोजी येथील पेट्रोल पंपावर हरवलेला मोबाईल परत करण्यात आला आहे. 

वणी ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या हस्ते व पोलिस उपनिरीक्षक रत्नपारखी यांच्या उपस्थितीत सोमवारी हा मोबाईल सतीश श्रीराम करडे (रा. मुरधोनी) यांना परत दिला असून वणी पोलीस प्रशासनाचे यावेळी त्यांनी आभार व्यक्त केले.
हरवलेला मोबाईल वणी पोलिसांकडून मूळ मालकाला परत हरवलेला मोबाईल वणी पोलिसांकडून मूळ मालकाला परत Reviewed by सह्याद्री चौफेर on April 02, 2025 Rating: 5
Powered by Blogger.