टॉप बातम्या

अवैध दारू विक्री प्रकरणी दोघांना अटक

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी : येथील टागोर चौक, गणेशपूर रोड येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन इसमाना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शत्रुघ्न कुडमेथे (पोलीस कॉन्स्टेबल) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी सदानंद अशोक पथाडे (वय 24) रा. केसूर्ली व हर्षल राकेश खरे (वय 20)  रा. रंगनाथ नगर, वणी हे विनापरवाना विदेशी दारूची विक्री करीत असताना आढळले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रॉयल चॅलेंज कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या (किंमत 9120 रुपये), ओल्ड मंक कंपनीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या (किंमत 6960 रुपये) आणि एमएच 29 एस 846 क्रमांकाची जुनी हिरो होंडा मोटारसायकल (अंदाजे किंमत 25000 रुपये) असा एकूण 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार सीमा राठोड करत आहेत.सदरची कारवाई वणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांचे आदेश्याने पो.का. गजानन यांनी केली
Previous Post Next Post